25.6 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeलातूरलातूररोड-जळकोट-बोधन रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणार

लातूररोड-जळकोट-बोधन रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणार

जळकोट : प्रतिनिधी
गत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लातूर रोड- जळकोट-बोधन या महत्वपूर्ण रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करू, आर्थिक तरतूद व्हावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा मार्ग लवकर कसा पूर्ण होईल. यासाठी प्रयत्न केले जातील तसेच लातूर जिल्ह्याचा जो पीक विम्याचा प्रश्न आहे तो सोडविण्यासाठीही प्रयत्न केला जाईल, येणा-या काळात ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्याचे नियोजन, जळकोटला सुसज्ज एमआयडीसी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन नूतन खासदार डॉ. शिवाजीराव काळे यांनी केले.

लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडून आल्याबद्दल तसेच त्यांना भरघोस मते दिल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी येथील मार्केट यार्ड येथे आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रसंगी ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मन्मथ किडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, माजी जि प सदस्य बाबुराव जाधव,माजी चेअरमन गणपतराव धुळशेट्टे, आदी उपस्थित होते .

खासदार डॉक्टर शिवाजीराव काळे यांचा जळकोट तालुका काँग्रेस कमिटी, जळकोट बाजार समिती, शिवसेना उद्धव ठाकरे गट, अल्पसंख्यांक काँग्रेस, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद संघटना, रोजगार सेवक संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, मागासवर्गीय काँग्रेस , सरपंच संघटना जळकोट, व्यापारी असोसिएशन ,वांजरवाडा जिल्हा परिषद गट, सकल मराठा समाज, नाभिक समाज , महिला काँग्रेस, जळकोट नगरपंचायत तसेच अन्य तालुक्यातील पदाधिका-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नूतन खासदार शिवाजीराव काळे म्हणाले की, लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये कार्यकर्त्यांचा सिंंहाचा वाटा आहे, हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. येणा-या काळात याची चांगले कामे करून परतफेड करू, याप्रसंगी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील यांनी खासदार महोदयांकडे जळकोट तालुक्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला रेल्वे मार्गाचा प्रश्न तात्काळ सोडवावा यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन केले .

या कार्यक्रमास माजी सभापती धोंडीराम पाटील, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्ता पवार, शिवसेना तालुकाप्रमुख मुक्तेश्वर येनावरे, माजी सभापती व्यंकटराव केंद्रे, बालाजी ताकबीडे, सुनंदा धर्माधिकारी, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नूर पठाण, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे, मागासवर्गीय काँग्रेस तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे ,शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष नेमीचंद पाटील, महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमती पांचाळ, शहराध्यक्ष डॉ. काळे , शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष नीतिन धुळशेट्टे, मेहताब बेग, आशिष पाटील राजूरकर, सरपंच मुकुंद पाटील, सरपंच सुनील लोहकरे, सकल मराठा समाजाचे श्रीनिवास पाटील, बाजार समिती संचालक संतोष पवार, विश्वनाथ इंद्राळे, नगरसेवक डॉ. सचिन सिद्धेश्वरे यांच्यासह परमेश्वर धुळशेटे , प्रमोद दाडगे, अक्षय बडगीरे, अशोक कारभारी, सिद्धार्थ सुर्यवंशी, सोनकांबळे , बाबुराव पाटील, सरपंच रवी गोरखे, संदीप बिरादार, नगरसेवक ओंकार धुळशेट्टे, संग्राम नामवाड, शिवंिलंग बोधले, संजय देशमुख, भागवत माळी, नगरसेवक गजेंद्र किडे, सोसायटीे पदाधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचालन काँग्रेसचे कार्यकर्ते कैलास गोंड यांनी केले तर आभार बेग यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR