लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकारी संघटनेचे ४८ वे राज्यव्यापी अधिवेशन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी लातूर मध्ये संपन्न हेणार आहे. कार्निवल रिसॉर्टमध्ये आयोजित दोन दिवशीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्रधारी कंपनीतील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार राहणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महावितरणचे संचालक सचिन तालेवार, कार्यकारी संचालक परेश भागवत, महापारेषणचे कार्यकारी संचालक सुचिता भिकाने, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक डॉ. नितीन वाघ, महावितरणच्या लसतूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले हे उपस्थित राहणार आहेत. १९७८ साली स्थापन झालेली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशन ही महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य शासकीय कंपनी आहे. तीनही कंपन्यांतील वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती व तंत्रज्ञान, सुरक्षा व अंमलबजावणी, जनसंपर्क व विधी विभागातील अतांत्रिक अधिका-यांचे नेतृत्त्व करणारी एकमेव बलाढ्य संघटना आहे.
संघटनेच्या राज्यव्यापी वार्षिक ४८ व्या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्रातील तिन्ही कंपन्यांची सद्यस्थिती, खासगीकरण व वीज उद्योग आर्थिक सक्षमीकरण, अतांत्रिक अधिका-यांची सरळसेवा भरती, पदोन्नती, मनुष्यबळ पुनर्रचना यावर विचार मंथन होणार असल्याने हे अधिवेशन महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या वाटचालीत दिशादर्शक ठरेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दिनेश लडकत, सरचिटणीस संजय खाडे, संघटन सचिव विजय गुळदगड आणि केंद्रीय कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेचे केंद्रीय सहसचिव श्री अजय गुळवे, केंद्रीय सहसचिव श्री उमेश काळे, लातूर परिमंडळ कार्यकारिणीचे अध्यक्ष रामानंद पडवळ, सचिव दिनेश ठाकूर, अभिजीत ढाकणे, अजित जैन, मनोज पेठकर, संतोष महापुरे, दिलीप अकोसकर, महादेव सुडे, सविता पवार तसेच सल्लागार श्री चेतन वाघ, जालिंदर मंगळवेडेकर यांच्यासह लातूर परिमंडल कार्यकारिणीचे सर्व सभासद परिश्रम घेत आहेत. शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण करून एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या लातूर या ऐतिहासिक नगरीत होणा-या ४८ व्या वार्षिक अधिवेशनास सर्व सभासदांनी, पदाधिका-यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे लातूर परिमंडळ कार्यकारीनिचे अध्यक्ष रामानंद पडवळ यांनी केले आहे.

