22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरलातूर-कुर्डूवाडी-टेभुर्णी महामार्गाच्या कामाला मिळणार प्राधान्यक्रम

लातूर-कुर्डूवाडी-टेभुर्णी महामार्गाच्या कामाला मिळणार प्राधान्यक्रम

लातूर : प्रतिनिधी
लातूरचे नवनीर्वाचीत खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी  गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते  वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन  मतदार संघातील प्रश्नावर चर्चा केली. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्र्यांनी  सकारात्मक प्रतिसाद देत लातूर-कुर्डूवाडी-टेंभुर्णी या महामार्गाच्या चौपदरीकरणासह सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. लातूरचे नवनीर्वाचीत खासदार डॉ. शिवाजी काळगे आता मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी चांगलेच सक्रीय झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनास जाण्यापुर्वी त्यांनी लातूर येथे माजी पालकमंत्री आमदार  अमित विलासराव देशमुख यांच्या समवेत लातूर जिल्हा व लातूर लोकसभा मतदार संघातील विकासात्मक प्रकल्पाबाबत चर्चा केली होती.
लातूर-टेभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित राहीला आहे. शहरातील गरुड चौक ते पु. अहिल्यादेवी होळकर चौक या दोन महामार्गाला जोडणा-या लिंकरोडला मंजुरी घेणे, शहरातील साईनाका ते एमआयटी कॉलेज या राष्ट्रीय महामार्गावर स्ट्रीटलाइट लावणे, काही महामार्गांची दुरुस्ती करणे यासह विविध मागण्याची आमदार देयामुख यांची निवेदणे यावेळी त्यांनीसोबत घेतली होती. गुरुवारी सकाळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रश्नावर चर्चा केली, लातूर-टेंभुर्णी महामार्गाचे चौपदरीकरण, गरुड चौक ते पू. अहिल्यादेवी होळकर चौक या दोन महामार्गाला जोडणा-या लिंकरोडला मंजुरी घेणे, शहरातील साईनाका ते एमआयटी कॉलेज या रा्ष्ट्रीय महामार्गावर स्ट्रीटलाइट लावणे,
 या निवेदनासह शिरुर ताजबंद-उदगीर, घरणी-निटूर, लामजना-निलंगा या लिंकरोड मागणी संबंधी व इतर काही निवेदणे रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केली. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्र्यांनी  सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विषयावर विस्तृत चर्चा  केली, सर्व समस्या समजून घेतल्या सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडविले जातील, असे आश्वासन दिले. लातूर-कुडूवाडी-टेभुर्णी या महामार्गा संदर्भात त्यांनी संबंधीत अधिका-यांकडे विचारणाही केली हे विषय ताबडतोब मार्गी लावण्या संदर्भात संबधितांना त्यांनी सुचनाही केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR