लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दुरवस्था दूर करण्यासाठी आणि शाळांना नवीन वर्ग खोल्या बांधून देण्याबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्याकडून होत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून यासाठी जिल्हा नियोजनमधून तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल आमदार धिरज देशमुख यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे शाळांमधील वर्ग खोल्यांची पडझड झाली आहे. तर काही शाळांत स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे या शाळांमधील चित्र बदलण्यासाठी आमदार धिरज देशमुख हे प्रयत्नशील होते. त्यानुसार २३ शाळांसाठी २ कोटी ३८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या वर्गखोली ऐवजी लवकरच नव्या वर्ग खोलीत बसून शिकता येणार आहे.
यानुसार लातूर जिल्ह्यातील गातेगाव येथे २ नवीन वर्गखोल्या, साखरा येथे ३ नवीन वर्गखोल्या, मळवटी येथे ३ नवीन वर्गखोल्या, काटगाव येथे १ नवीन वर्गखोली, टाकळी ब. येथे १ नवीन वर्गखोली, मुरुड बु. येथे १ नवीन वर्गखोली, गातेगाव येथील शाळेत विद्यार्थिनींसाठी नवीन स्वच्छतागृह रेणापूर तालुक्यातील जवळगा येथे २ नवीन वर्गखोल्या, व्हटी नं. १ येथे ५ नवीन वर्गखोल्या, मोटेगाव येथे ८ नवीन वर्गखोल्या, सांगवी येथे ४ नवीन वर्गखोल्य.ा.
तळणी येथे मुले व मुलींसाठी नवीन स्वतंत्र स्वच्छ्तागृह, काळेवाडी येथे मुले व मुलींसाठी नवीन स्वतंत्र स्वच्छतागृह, रेणापूर येथे २ नवीन वर्गखोल्या, भंडारवाडी येथे मुलांसाठी नवीन स्वच्छ्तागृह, गरसुळी येथे २ नवीन वर्गखोल्या, ब्रह्मवाडी येथे मुले व मुलींसाठी नवीन स्वतंत्र स्वच्छ्तागृह, इटी येथे १ नवीन किचन शेड, नागापूर येथे १ नवीन किचन शेड, पाथरवाडी येथे १ नवीन किचन शेड तर औसा तालुक्यातील बिरवली येथे १ नवीन वर्ग खोली, कोरंगळा येथे ७ नवीन वर्गखोल्या आणि जायफळ येथे २ नवीन वर्ग खोल्याचे बांधकाम होणार आहे.