23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरलातूर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये नेमले जाणार ७८६ योजनादूत 

लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये नेमले जाणार ७८६ योजनादूत 

लातूर : प्रतिनिधी
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे ७८६ आणि शहरी भागात पाच  हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी  करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली  जाणार आहे. या योजनादूतांना  दरमहा १० हजार रुपये मानधन  दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे/ प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला.  (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.  १३ सप्टेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना ६६६.ेंँं८ङ्म्नंल्लंङ्मिङ्म३.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR