30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeलातूरलातूर जिल्ह्यात बुधवारी सरासरी १२.९ मि. मी. पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात बुधवारी सरासरी १२.९ मि. मी. पावसाची नोंद

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात बुधवार दि. १२ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत सरासरी १२.९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १४८.९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत  झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. लातूर- ०.६ (१५६.६) मि.मी., औसा- ३१.२ (२०४) मि.मी., अहमदपूर- १.७ (९४.३) मि.मी., निलंगा -४३.४ (१२९.७) मि.मी, उदगीर- ३.६ (९३.९) मि.मी, चाकूर-०.४ (१५४.६) मि.मी, रेणापूर-४.१ (१६९.७) मि.मी, देवणी- ०.३ (१०५.३) मि.मी, शिरुर अनंतपाळ- ४.३ (१४०.७) मि.मी, जळकोट-१.५ (३७.१) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १४८.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR