लातूर जि. प.साठी २४२, पं. स. साठी ४२० उमेदवार रिंगणात 

जिल्हा परिषद गटांतून २१२ तर पंचायत समिती गणांतून ३५८ जणांची माघार 
बहुतांश ठिकाणी दुरंगी, तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार 
लातूर : प्रतिनिधी 
लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि. २७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या ५९ गटांतून २१२ जणांनी तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ११८ गणांतून ३५८ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ तर पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ४२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
लातूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ४० तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी ७० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात प्रामुख्याने काँग्रेस महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशी सरळ, सरळ दुरंगी लढत होत आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा समावेश आहे. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणूक रिंगणात उतरली आहे तर भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आल्याने त्याचा मोठा फटका भाजपाला बसणार आहे, असे सध्याचे चित्र आहे.
औसा तालुका जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात बहुतांश ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी दुरंगी लढत दिसून येते तर काही मतदारसंघात तिरंगी लढत होईल, असे चित्र आहे.
निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ४१ तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी दुरंगी तर काही तालुक्यात काँग्रेस विरुद्ध भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशीही लढत होणार आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २ जागांसाठी १२ तर पंचायत समितीच्या ४ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अशी तिरंगी तर काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी  लढत दिसून येत आहे.
देवणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी ११ तर पंचायत समितीच्या ६ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी काँग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी तर काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत होणार आहे.
उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी ३५ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ही युतीविरुद्ध काँग्रेस अशी तर काही ठिकाणी काँग्रेस-भाजपा युती आणि शिवसेना एकनाथ शिंदे अशी तिरंगी लढत होईल, असे चित्र  आहे.
जळकोट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या ६ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये अनेक जणांनी अपक्ष उमेदवारीदेखील  आहेत. जळकोट तालुक्यामध्ये काही ठिकाणी तिरंगी लढत तर काही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे तर अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलेल्या गुत्ती मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत होत आहे.
अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मातब्बर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढतीचे चित्र आहे.
चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी २० तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ताकदीने मैदानात उतरले असून प्रत्येक गटात आणि गणात चुरशीची लढत होणार आहे.
रेणापूर तालुक्यात 
४ जागांसाठी १६ उमेदवार
रेणापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी १६ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा, मनसे आणि अपक्ष अशी  चौरंगी, काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा व वंचित अशी तिरंगी, काही ठिकाणी कॉंग्रेस व भाजपा अशी  दुरंगी, काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना (शिंदे गट) काही ठिकाणी कॉग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) काही ठिकाणी भाजपा, कॉंग्रेस व वंचित तिरंगी तर काही ठिकाणी कॉग्रेस, भाजपा व वंचित अशी तिरंगी लढती होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news