22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरलातूर तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर

लातूर तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तालुका स्तरीय प्रथम पारितोषिक लातूर तालुक्याने शासकीय शाळा गटात शासकीय निवासी अुनसूचित जाती प्राथमिक शाळा, एमआयडीसी लातूर प्रथम व खाजगी गटातील तुळजाभवानी प्राथमिक विद्यालय, लातूर या शाळेतने प्रथम क्रमांक पटकावल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता, परिसरच स्वच्छता, पालकांचा, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, स्वच्छता मॉनीटर अशा विविध ३० प्रश्नांच्यावर शाळांनी स्वमुल्यांकण करूण गुण तयार केले होते. त्याची पाहणी करून केंद्र प्रमुखाने एक खाजगी व एक शासकीय शाळा निवडली. या शाळांचे प्रस्ताव तालुका स्तरावर आले. तालुका स्तरावर मुल्यांकण समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी यांनी तीन खाजगी व तीन शासकीय शाळांची एकूण गुणांचे मुल्यांकण करून निवड केली. तालुका स्तरावरावरच्या शाळांचे पुरस्कार जाहिर केले आहेत. त्यांना अनुक्रमे ३ लाख, २ लाख, १ लाख रूपये पुरस्कार रूपात मिळणार आहेत.

लवकरच पुरस्कार वितरण
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातंर्गत लातूर तालुक्यातील सर्व शाळांनी दि. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत विविध उपक्रम राबवले. त्यांचे मुल्यांकण शाळांनी स्वत: केले. तालुकास्तरीय समितीने शाळांनी दिलेल्या मुलांकणाची तपासणी करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढला. त्यांना गुणानुक्रमे ३ लाख, २ लाख, १ लाख रूपये पुरस्कार स्वरूपात लवकरच लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वी कार्यक्रम घेवून देण्यात येणार असल्याची माहिती लातूरचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगले यांनी दिली.

विभाग स्तरावरामुळे आणखी दोन शाळांना संधी मिळाली
शासनाने राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातंर्गत विभाग स्तरावर खाजगी गटात लातूर येथील ज्ञानप्रकाश शाळा द्वितीय आली आहे. शासकीय गटात लातूर तालुक्यातील मांजरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तृतीय आली आहे. तालुका स्तरावर प्रथम आलेल्या शाळा विभाग स्तरावर चमकल्याने पुन्हा तालुक्यातील आणखी दोन शाळांना ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कारात येण्याची संधी मिळाल्याचेलातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR