लालबाग राजाच्या मंडपात शॉर्ट सर्किट; भाविकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडपात रविवारी किरकोळ शॉर्ट सर्किट झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक मंडपात उपस्थित असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनेनंतर पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

महापालिकेच्या एका अधिका-याने वृत्तसंस्था ढळक ला दिलेल्या माहितीनुसार, मंडपातील फीडर पिलरमध्ये किरकोळ शॉर्ट सर्किट झाले होते. परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

फीडर पिलर म्हणजे वीज वितरणासाठी वापरले जाणारे एक विद्युत उपकरणांचे कॅबिनेट असते. त्यामध्ये सर्किट ब्रेकर, फ्यूज आणि स्विच यांसारखी उपकरणे असतात.
दरम्यान, याच लालबाग परिसरात काही तासांपूर्वी विजेचा धक्का लागून एका आठ वर्षांच्या मुलीसह एका महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या दुर्घटनेत अन्य चार जण जखमी झाले आहेत.

ही घटना रात्री सुमारे २. ३० वाजता काळाचौकी परिसरातील दत्ताराम लाड मार्गावरील दिग्विजय मिल चाळ येथे घडली. गणेशोत्सवामुळे परिसरात मोठी गर्दी होती. मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पाण्याच्या आणि शीतपेयांच्या स्टॉलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने वीजप्रवाह उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला आणि खबरदारी म्हणून परिसराची नाकेबंदी केली.

जोगेश्वरीतही तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी परिसरातही रविवारी विजेच्या धक्क्याची आणखी एक दुर्घटना घडली. गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापरल्या जाणा-या बंद कृत्रिम तलावात प्रवेश करताना १९ वर्षीय कामगाराला विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील विविध गणेश मंडपांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वीजपुरवठा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16

Latest news