32.1 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयलाहोरच्या धावपट्टीवर विमानाचे टायर पेटले! रन-वे बेमुदत बंद; घटनेची चौकशी सुरू

लाहोरच्या धावपट्टीवर विमानाचे टायर पेटले! रन-वे बेमुदत बंद; घटनेची चौकशी सुरू

लाहोर : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळाला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग अत्यंत मोठी असल्याचे सांगितले जात होते. आग लागल्याने सर्व विमानांचे उड्डाण रोखण्यात आले आणि विमानतळाचे व्यवस्थापन लष्कराने नियंत्रणात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोर विमानतळावर पाकिस्तानी सैन्याचं एक विमान उतरत असताना विमानाच्या टायरला मोठी आग लागली. आज सकाळी १० वाजता ही आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीमुळे रनवे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.

या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. आग लागल्यानंतर विमानतळावर सर्वत्र धुराचे लोट पसरले. आग आणि धुराचे लोट पसरल्याने एकच खळबळ उडाली. आधीच भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असल्याने पाकिस्तानी नागरिक भयभीत आहेत. मात्र, ही आग विमानाच्या टायरला लागल्याचे कळल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

विमानांचे उड्डाण कधी सुरू होईल याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. सध्यातरी एकही विमान उड्डाण घेणार नसल्याचे लाहोर एअरपोर्टने जाहीर केलं आहे. तसेच जी विमानं उतरणार होती त्यांचेही मार्ग बदलले असून दुस-या ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशी विमानतळावरच ताटकळत बसले आहेत. विमानाच्या चाकाला आग कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाची विमान कंपनी आणि विमानतळ प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR