28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयलोकांचा आयुर्वेदावर विश्वास : राष्ट्रपती मुर्मू

लोकांचा आयुर्वेदावर विश्वास : राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आयुर्वेदाच्या नावाखाली खोटे आणि दिशाभूल करणारे दावे करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. काही लोक लोकांच्या पारंपरिक वैद्यकीय व्यवस्थेवरील दृढ विश्वासाचा फायदा घेत आहेत आणि निष्पाप नागरिकांचे नुकसान करत आहेत, असा आरोपही राष्ट्रपतींनी केला. आयुर्वेद टिकवून ठेवण्यासाठी संशोधनात गुंतवणूक करणे, औषधांचा दर्जा सातत्याने सुधारणे आणि आयुर्वेदाच्या अभ्यासाशी संबंधित शैक्षणिक संस्था मजबूत करणे आवश्यक आहे, असा दावाही त्यांनी केला.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूूट ऑफ आयुर्वेदाच्या (एआयआयए) आठव्या स्थापना दिनाच्या समारंभात बोलत असताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, आयुर्वेद ही जगातील सर्वांत प्राचीन प्रणालींपैकी एक असून भारताला मिळालेली अमूल्य देणगी आहे, भारत जगभरात यासाठी ओळखला जातो. निरोगी राहण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही निरोगी असणे आवश्यक आहे, असा सल्लाही यावेळी राष्ट्रपतींनी दिला.

आमच्या पिढ्यांचा आयुर्वेदावर दृढ विश्वास आहे. काही लोक या विश्वासाचा गैरफायदा घेऊन नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचवतात आणि आयुर्वेदाची प्रतिमा मलिन करतात. अशा लोकांवर कठोर कारवाईची गरज आहे. तसेच आयुर्वेदिक उत्पादने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवावीत, जेणेकरून त्यांची कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्यात करता येईल, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR