कळंब : सतीश टोणगे
वय झाले की घरी का बसू वाटत नाही. असा प्रश्न प्रत्येक घरोघरी ज्येष्ठांना विचारला जातो पण याचे उत्तर घरी बसून तरी काय करू असे दिले जाते. नोकरी साठी पण काही वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. त्यामुळे त्या वयात सेवानिवृत व्हावेच लागते. घरात पण कारभारी वृद्ध झाले की,कारभार मुलगा पाहतो पण या कडे सर्वांचे लक्ष असते. ते पण गरजेचे असते.
राजकरणात पण वयोमर्यादा असावी, यावर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वय झाल्याने , त्यांच्याच पक्षातील नेतेमंडळीने पक्ष फोडला, आणि वयावर राजकारण सुरू झाले. निवडणुकीच्या प्रत्येक सभेत अजित पवार यांनी हा मुद्धा लावून धरल्याने, ग्रामीण भागात मोदी ने सुद्धा वय झाल्याने , राजकारणातून निवृत्ती जाहीर करावी अशी कुजबूज होऊ लागली. एकंदर राज्यात वय झाले तरी खासदार, आमदार होण्या साठी धडपड करणा-या नेते मंडळींची संख्या मोठी आहे. त्यांना वारसदार नको वाटतो, याचे कारण पण ते सांगत नाहीत, त्यामुळे राजकारणातील वयाच्या अटीचा कायदा होण्या ची गरज आहे.
वय झाले की सुरुवाती पासून निष्ठावंत राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे त्याचा सर्व खर्च नेत्यांनी करावा अशी चर्चा ग्रामीण भागात होत आहे.भारतात अनेक ज्येष्ठ नेते आज ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना वेगवेगळ्या पक्षाने तिकीट दिले आहे, तर काही पक्षाने जाणून बुजून तरुणांना डावलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या देशात मोदी आल्या पासून,प्रशासकीय अधिकारी ,महंत, महाराज ,यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात आहे, निवडूण आल्यावर हि मंडळी पाच वर्ष मतदार संघात फिरकत नसल्याने, विकास होत नाही. कार्यकर्त्याला संधी मिळत नाही, पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.