वाढत्या विकास दरावर प्रश्नचिन्ह

कॉंग्रेसने व्यक्त केली चिंता, मोदी म्हणतात, परदेश प्रवास टाळा
मॉस्को : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ शेअर करत देशाचा आर्थिक विकास दर ७.८ टक्क्यांवर गेल्याचा दावा केला. परंतु कॉंग्रेसने या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, केंद्र सरकारचा हा दावा खोटा आहे. केवळ आकड्यांचा फुगवटा करून जीडीपीत सुधारणा दाखविली जात असल्याचे कांग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, एकीकडे जीडीपी वाढलेला दाखवितानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात केवळ फिरण्यासाठी जाणे टाळावे, लग्न समारंभासाठीही परदेशाऐवजी भारताला प्राधान्य द्यावे, ‘मेड इन इंडिया’चा मंत्र प्रत्यक्ष जीवनात अंगीकारावा, असे आवाहन देशवासीयांना केले. यामुळेही आर्थिक विकास दराच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भारताने नोंदवलेल्या ७.८ टक्के आर्थिक विकासदराबद्दल देशवासीयांचे अभिनंदन. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वदेशीचा मंत्र स्वीकारणे आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. नागरिकांनी अनावश्यक खरेदी टाळावी आणि ‘गरज नसेल तर सोने खरेदी करू नका असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. आत्मनिर्भर भारत बनणे अत्यंत आवश्यक आहे. स्वदेशीचा मंत्र आणि ‘लोकल फॉर व्होकल’चा विचार स्वीकारला पाहिजे, असे मोदी म्हणाले.
भारताच्या आर्थिक प्रगतीला आणखी वेग देण्यासाठी आत्मनिर्भरता महत्त्वाची आहे. नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन देशात तयार होणा-या वस्तूंना प्राधान्य द्यावे. गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी टाळून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणा-या सवयी अंगीकारण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. परदेशात लग्न करण्याऐवजी भारतातच लग्नसमारंभ आयोजित करण्याला प्रोत्साहन द्यावे. देशात मोठ्या प्रमाणावर होणा-या लग्नसमारंभांमुळे पर्यटन, हॉटेल, केटरिंग, कापड, दागिने यांसह विविध व्यवसायांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितका खर्च देशातच करण्याची सवय लावून घ्यावी, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला.

लोकल फॉर व्होकल
मंत्र जपायला हवा
आत्मनिर्भर भारत बनणे अत्यंत आवश्यक आहे. स्वदेशीचा मंत्र आणि ‘लोकल फॉर व्होकल’चा विचार स्वीकारला पाहिजे. ‘मेड इन इंडिया’चा मंत्र प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. भारताच्या आर्थिक प्रगतीला आणखी वेग देण्यासाठी आत्मनिर्भरता महत्त्वाची आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 01.09.26
20:42
Video thumbnail
Latur|एसटीचा प्रवास करण्यापूर्वी हे तपासा; अन्यथा भरावे लागेल पूर्ण तिकीट!
03:44
Video thumbnail
Latur|हेल्मेट मोहिमेसाठी वरिष्ठ अधिकारी मैदानात; महामार्गावर कडक तपासणी
02:48
Video thumbnail
Nanded Accident|नांदेडमध्ये भरधाव पिकअपने स्कुटीस्वार तरुणीला दिली धडक; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू
01:00
Video thumbnail
Nanded Congress Protest|राहुल गांधींवर ॲट्रॉसिटी गुन्हा; नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन
03:06
Video thumbnail
Latur|स्वस्त हेल्मेटच्या नादात जीव धोक्यात! लातुरात डुप्लिकेट हेल्मेटचा पर्दाफाश
03:57
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘नो हेल्मेट, नो एक्सक्यूज’! आजपासून थेट कारवाई
05:43
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
01:48:18
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16

Latest news