27.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeलातूरवादळी पावसाने ११ एकर पपईच्या बागेचे नुकसान

वादळी पावसाने ११ एकर पपईच्या बागेचे नुकसान

निटूर : वार्ताहर
वादळी वा-यासह कोसळत असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतक-यांंचे व वास्तव्यास असलेल्या घरांचे नुकसान झाले आहे. निटूर लगतच आसलेला हणमंतवाडी (मु) येथील शेतक-याचे ११ एकर पपईच्या बागेचे नुकसान झाले आहे.

सलग तीन दिवसांपासून निलंगा तालुक्यातील विविध गावात विजेच्या कडकडाट वादळी वा-यासह मान्सूनपूर्व पाऊस कोसळत असून त्यात १०० पेक्षा अधिक झाडे व ४० विद्युत पोल उन्मळून पडले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हाडगा, निटूर व पानंिचंचोली भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. पावसाचा जोर एवढा मोठा होती की अर्धा तासातच ओढे नाले भरुन वाहत होते. त्याच वादळी वा-याात तालुक्यातील हाणमंतवाडी (मुगाव) येथील शेतकरी हनुमंत माने, सुग्रीव माने, ओमप्रकाश रुबदे, गंगाधर रुबदे, सोनेराव जाधव, राधाबाई जावळे, दत्तात्रय शिरमाळे या शेतक-यांच्या ११ एकर पपईच्या बागेचे पूर्णता नुकसान झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR