30.7 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रवायकरांच्या नातेवाईकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन

वायकरांच्या नातेवाईकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन

मुंबई : ज्या मोबाईलवरून ईव्हीएम अनलॉक केले तोच मोबाईल रवींद्र वायकरांना दिला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वादात सापडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीबद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली आहे.

या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, मुंबई पोलिसांनी नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणा-या फोनचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआरआय नोंदवला. रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर यांची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक अटीतटीची लढत झाली.

अटीतटीच्या लढाईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला होता. सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, फेरमतमोजणीत पोस्टल मतं निर्णायक ठरल्याने रवींद्र वायकर यांनी निसटता विजय मिळवला होता. आता या प्रकरणातील एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आता तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR