35.2 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeमनोरंजनविकी कौशल जखमी, हाताला केले प्लास्टर

विकी कौशल जखमी, हाताला केले प्लास्टर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे विकी कौशल याचे एकामागून एक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विकी कौशल याचे व्हायरल होणारे फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. नुकतीच चित्रपटाच्या सेटवर विकी कौशल याला दुखापत झाली. विकी कौशल याच्या हाताला प्लास्टर लावल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. आता पुढील काही दिवस विकी कौशल याला आराम करावा लागणार आहे.
दरम्यान, विकी कौशल याने त्याच्या तब्येतीबद्दल कोणतेही अपडेट शेअर केले नाहीत.

मात्र, व्हायरल होणारे फोटो पाहून दिसत आहे की, विकी कौशल याला मोठी दुखापत झाली आहे. विकी कौशल याला ही दुखापत ‘छावा’ चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत झाल्याने आता चित्रपटाची शूटिंग ही काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे.

डॉक्टरांनी विकी कौशल याला पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाच्या भूमिकेसाठी विकी कौशल याचे जोरदार कौतुक करण्यात आले. ‘सॅम बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी कतरिना कैफ ही उपस्थित होती. सोशल मीडियावर ‘सॅम बहादूर’ चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील कतरिना कैफ ही दिसली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR