22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भात महाविकास आघाडीची मुसंडी

विदर्भात महाविकास आघाडीची मुसंडी

नागपूर : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. तर त्यानंतर देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेल्या कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे. अशातच विदर्भात महायुतीला काहीसा धक्का बसताना दिसत आहे. विदर्भात सध्याघडीला महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. विदर्भात महाविकस आघाडी ६ ठिकाणी आघाडीवर आहे. तर महायुती ४ ठिकाणी पुढे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

विशेष बाब म्हणजे पश्चिम विदर्भातील महत्वाची जागा असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे सुरवातीपासून पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. तर चौथ्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर तब्बल ३२,४६८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे १६,२०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान ५,२१७ मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे विदर्भात मतमोजणीमध्ये सकाळी दहा ११ वाजेपर्यंत महाविकास आघाडीला कुठेतरी यश येताना दिसत आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्या फेरीअखेर ३१ हजार ५८० मतांनी आघाडीवर आहेत. नितिन गडकरी यांना आता पर्यंत १ लाख १६ हजार ६०० मत मिळाले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे सुरवातीपासून पिछाडीवर आहे.

गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अशोक नेते (भाजप) पिछाडीवर आहे. तर काँग्रेसचे नामदेव किरसान ८८५३ मतांनी आघाडीवर आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे पाचव्या फेरीतही पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तब्बल ४२, १८२ हजार मतांनी आघाडीवर आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असल्याचे बघायला मिळाले आहे. यात मात्र काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांनी एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील सहाव्या फेरी अखेरीस ५६९३ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे अनुप धोत्रे दुस-या क्रमांकावर असून वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर मोठ्या पिछाडीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे ८१४९३ मते घेत आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे ७३९०३ मत घेत पिछाडीवर आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे १६,२०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे ९१४६ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रामदास तडस ७६९७४ मत घेत पिछाडीवर आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सातव्या फेरीत काँग्रेसचे संजय देशमुख यांनी १,५६,२५३ मते घेऊन ३२,२१३ मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील १,२४,०४० मते घेत पिछाडीवर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR