21.5 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeलातूरविद्यानंद महाराज यांची भागवत कथा फेबु्रवारीत 

विद्यानंद महाराज यांची भागवत कथा फेबु्रवारीत 

लातूर : प्रतिनिधी
श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग सेवा समितीच्या वतीने दि. १४ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत लातूरमध्ये श्री श्री अष्टोत्तर शत (१०८) कुंडात्मक अतिरुद्र महायाग (यज्ञ) आणि प. पू. विद्यानंदजी महाराज  यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ८ वाजल्यापासून होम हवन आदी धार्मिक विधी आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून प. पू. विद्यानंदजी महाराज बाबा  यांची भागवत कथा होईल. यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीचे सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यंदाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष हरिप्रसाद मंत्री आहेत. राजीव गांधी चौक रिंग रोड पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात महायाग व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र महायोग (यज्ञ )आणि श्रीमद् भागवत कथेच्या कालावधीत दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यानिमित्त नुकतेच भोजन शाळेचे पूजन भोजन समितीचे अध्यक्ष उमेश गारठे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी प.पू. विद्यानंदजी महाराज, प. पू. बालकानंदजी महाराज, हरिप्रसाद मंत्री, संजय बोरा, राजेश्वर बुके उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR