लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सहकार्यातुन व सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख फाउंडेशन, लायन्स क्लब लातूर आणि उदयगिरी नेत्र रुग्णालय व यांच्या संयुक्त्त विद्यमानाने लातूर तालुक्यातील मौजे पाखरसांगवी येथे मोफत नेत्ररोग निदान व अल्पदरात मोतीबिंदू आजाराचे शस्त्रक्रिया करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये गावातील १३२ महिला व पुरुषांनी आपला सहभाग नोंदवून तपासणी करुन घेतली. या शिबिरामध्ये १५ पुरुष व महिलांना मोतीबिंदू आजार आढळून आला त्यातील ६ रुग्णांना शस्त्रक्रिया साठी उदयगिरी हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विलास को-ऑपरेटिव बँक चेअरमन अॅड किरण जाधव, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, लॉयन्स क्लब लातूरचे अध्यक्ष अशोक पांचाळ, प्रा. सुधाकर जोशी, उदय गिरी हॉस्पिटलचे डॉक्टर निकुंज गुजराथी, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉक्टर मन्मथ भतांब्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राम चामे, बाभळगावचे माजी उपसरपंच अविनाश देशमुख, प्रवीण सूर्यवंशी तात्यासाहेब देशमुख, साहेबराव देशमु, दत्तात्रय श्रीजीत ढगे, रामेश्वर लखादिवे, ख्वॉजाभाई पठाण, नरेंद्र सरवदे, सुरवसे, संस्थेचे सोशल प्लॅनर गजानन बोयणे व पाखरसांगवी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.