लातूर : प्रतिनिधी
राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखानदारीत ऊस उत्पादक शेतक-यांना एफ. आर. पी. पेक्षा अधिक भाव देणा-या उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२ साईटवर दि. ९ मार्च रोजी वजन काट्याची शासकीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधीच्या संयुक्त पथकाने पाहणी केली. वजन काट्याची तपासणी करुन कारखान्यावरील वजन काटा योग्य व अचुक असल्याचा निष्कर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे विलास युनिट-२ येथील वजन काटे अचुक असल्याचे प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांकडे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. सोमवारी अचानक वजन करुन व गव्हाणीकडे गेलेल ्या वाहनांची परत बोलावून काट्याची तपासणी केली. भरलेली व रिकामी केलेल्या वाहनांचे वजन घेण्यात आले ते अचूक असल्याचे पथकाने सांगीतले. त्यानुसार विलास युनिट-२ म्हणजे प्रगती या ब्रीदवाक्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतक-यांचा विकास, विश्वास या साखर कारखान्याने आपले वेगळेपण जपले आहे. ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मांजरा परिवारातील कारखान्यांचे मार्गदशक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे यांच्या सूचनेनूसार कारखाना व्यवस्थापन नियोजन, पारदर्शकता ठेवून कार्य करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भरारी पथकात उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, वैद्यमापनशास्त्र निरिक्षक विठ्ठल चिंतलवाड, लेखा परिक्षक श्रेणी-२ राजकुमार पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार, चिफ अकांंैटंट ओमप्रकाश चांडक, वर्क्स मॅनेजर अजय कोळगे, शेतकी अधिकारी श्रीराम पाटील, ऊस पुरवठा अधिकारी जनार्दन पाटील, कार्यालय अधीक्षक अरविंद देशमुख, प्रगतशील शेतकरी दिगांबर माने, लक्ष्मण नागलगावे, केनयार्ड सुपरवायझर सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

