18.8 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeलातूरविश्वासनीय व्यक्तिमत्त्व दिलीपराव देशमुख यांच्यामुळेच जिल्ह्यात सहकार सक्षम

विश्वासनीय व्यक्तिमत्त्व दिलीपराव देशमुख यांच्यामुळेच जिल्ह्यात सहकार सक्षम

लातूर : प्रतिनिधी
केंद्रातील भाजपाचे सरकार देशातील सहकार बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात सहकाराची पिछेहाट होताना दिसत आहे. मात्र माजी मंत्री दिलीपराव देशमूख या विश्वासनिय व्यक्तीमत्वामुळेच लातूर जिल्ह्यातील सहकार सक्षमपणे वाढत आहे, असे मत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गाेिवंदपूरकर यांनी व्यक्त केले.
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८ सप्टेंबर रोजी येथील पु. अहिल्यादेवी होळकर चौकातील विष्णुदास मंगल कार्यालयात झाली. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अशोक गोविंदपूरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. किरण जाधव होते. विचारपिठावर बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. समद पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, बँकेचे संचालक अनिल शिंदे, व्यंकटेश पुरी, अरुण कामदार, अजय शहा, डॉ. कल्याण बरमदे, सलीम उस्ताद, प्रा. डॉ. जयदेवी पवार, चंद्रकांत धायगुडे, रमेश थोरमोटे, पंडित कावळे, सीए. ऋषिकेश पाटील, गणेश एसआर देशमुख, माजी संचालक महादेव मुळे यांची उपस्थिती होती.
बँकेचे डिपॉझिट वाढवणे हे सर्वात अवघड काम आहे. परंतू, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे डिपॉझिट वाढत आहेत. यामागे माजी मंत्री दिलीपराव देशमुख व बँकेचे संस्थापक चेअरमन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा विश्वासनिय चेहरा आहे, असे नमुद करुन अशोक गोविंदपूरकर पुढे म्हणाले, विलास बँक आता २३ वर्षांची झाली. ही बँक आता तरुण झाली आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या संकलपनेतून विलास बँकेची स्थापना झाली. समाजातील नाही रे म्हणणा-या घटकांची आर्थिक पत निर्माण व्हावी, हा उद्देश विलासरत्न विलासराव देशमुख यांचा ही बँक स्थापनेमागचा होता. माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने तो उद्देश साधला आहे. गरिबांची आर्थिक पत निर्माण करण्यामध्ये विलास बँकेचे खुप मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले.
अहवाल वाचन करताना अ‍ॅड. किरण जाधव म्हणाले, लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील सहकारी बँकांच्या क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या विलास को-ऑपरेटिव्ह बँकेने स्थापनेपासून आजपर्यंत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या बेरोजगार युवक, व्यापारी, उद्योजक व शेतीपूरक व्यवसायिक सभासदांची आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टीने बँकेने धोरण राबविले.  विकासरत्न विलासराव देशमुख यांचे विचार आणि सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची प्रेरणा व बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेची गेल्या २३ वर्षांची वाटचाल इतर को-ऑपरेटिव बँकांसाठी पथदर्शी राहिलेली आहे. बँकेच्या स्थापनेपासूनच बँकेचे कामकाज पारदर्शक राहिले आहे. त्यामुळे आतापर्यंत बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे.  विलास बँकेने बँकिंग सेवेतील बदल स्वीकारले आहेत. सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकता आणली आहे. ग्राहकांना तत्पर सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सभासद व भाग भांडवल, राखीव व इतर निधी, ठेवी, ठेवीवरील विमा, कर्ज, अग्रक्रम व दुर्बल घटकांना दिलेले कर्जे, गुंतवणूक,कर्ज वसुली/एनपीए, ऑडिट वर्ग,नफा विभागणी आदी विविध विषयाची सविस्तर माहिती बँकेचे अध्यक्ष किरण जाधव यांनी उपस्थिताना दिली.
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे यांनी बँकेच्या २३ व्या आधीमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभे पुढील विविध विषयाच वाचन  केले त्या सर्व विषयाला सभासदांनी टाळ्यांच्या गजरात अनुमती दिली. या सभेस  अनंत बारबोले, अ‍ॅड. फारुख शेख, प्रा.प्रवीण कांबळे, जितेंद्र स्वामी, रामचंद्र सुडे, आसिफ बागवान, सुलेखा कारेपूरकर आदीसह विलास बँकेचे सर्व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवातिला विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचलन  लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार बँकेचे संचालक व्यंकटेश पुरी यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR