25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeलातूरवीरशैव लिंगायतांचा आरक्षणासाठी महामोर्चा

वीरशैव लिंगायतांचा आरक्षणासाठी महामोर्चा

लातूर : प्रतिनिधी

लिंगायत महासंघ लातूरच्यावतीने वीरशैव लिंगायत समाजाचा लिंगायत, हिंदु लिंगायताच्या आरक्षणासाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात लिंगायत महासंघाचे अनेक शिवाचार्य व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला मंडळासह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. गंजगोलाई येथील महात्मा बसवेश्­वर मंदिरात शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून या महामोर्चाला सुरूवात झाली. हा महामोर्चा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शि.भ.प.शिवराज नावंदे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. त्याठिकाणी गेल्यानंतर तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

या महामोर्चात प्रा. सुदर्शनराव बिरादार, शैलेश पाटील चाकूरकर, शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर, बालानंद महाराज चापोली या धर्मगुरूंसह गुरूनाथ मग्गे, अविनाश रेशमे, शिवाजी रेशमे, माजी सभापती लक्ष्मीकांत मंठाळे, लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, राजशेखर लाळीकर, बालाजी पाटील येरोळकर, कैलास जांबकर, संगमेश्­वर बिरादार, सोमेश्­वर स्वामी, राजाभाऊ वाघमारे, मन्मथ पाटील, रामलिंग बुलबुले, विश्­वनाथप्पा मिटकरी, तानाजी पाटील भडीकर, संजय लिंबाळे, ऍड. अजय वागळे, नागनाथप्पा भुरके, प्रा.वैजनाथ मलशेट्टे, प्रा.विठ्ठल आवाळे, बसवराज ब्याळे, भिमाशंकर शेळके, बलराज खंडोमलके, सुनिल होनराव, विरेंद्र केवळराम, सुभाषप्पा सुलगूडले, सौ.छाया चिंदे, कल्पना बावगे, संगीता भुसनूरे, संगीता मलंग, वैशाली व्होनाळे, प्रिती सोनाळे, बालाजी पिंपळे, शिवराज शेटकार, प्रा. संगमेश्­वर पानगावे, शरणप्पा अंबुलगे, सुभाष शंकरे, विश्­वनाथ निगुडगे, शंकरराव पाटील गुंजोटीकर यांच्यासह हजारो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. मागण्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR