25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रवैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या

वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या एका आश्रमात एका महिला कीर्तनकाराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. या महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यानंतरच हत्येमागचे कारण समोर येईल.

महाराज ह.भ.प. संगीताताई पवार, असे हत्या झालेल्या महिला कीर्तनकाराचे नाव आहे. आश्रमात घुसून संगीताताई यांची हत्या करण्यात आल्याची बातमी समजताच वैजापूरसह संपूर्ण संभाजीनगरमध्ये खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीताताई यांची हत्या का केली? या गुन्ह्यामागे कोण आहे? याचा पोलिस शोध घेत आहेत. आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची चौकशी केली जात आहे. लवकरच या हत्येमागील गुन्हेगाराला अटक केली जाईल, असा विश्वास वैजापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR