लातूर : प्रतिनिधी
ज्या ठिकाणी हॉकर्स झोन जाहीर केला आहे, तेथे व्यवसाय करु द्यावा, अशी मागणी भाजीपाला, फळ विक्रेते तसेच पथ विक्रेत्यांनी केली होती. यावर दोन दिवसांत जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे आवश्वासन लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांनी दिले होते. परंतु, काहींच ठोस निर्णय न झाल्याने पथ विक्रेत्यांनी दि. १८ फेब्रुवारी रोजी भाजीपाला, फळे विक्री बंद ठेवली. त्यामुळे शहरात एकाही ठिकाणी भाजपाला, फळांची विक्री झाली नाही.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील भाजीवाले, फेरीवाले, फळवाले रस्त्यावर बसून छोटे-छोटे व्यवसाय करतात. मात्र लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली या व्यवसायिकांना हुसकावले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन आणि भाजीवाले, फेरीवाल्यांचा वाद सुरु आहे. फेरीवाल्यांचा प्रश्न सुटत नसल्यामुळे शनिवार दि. १५ फेबु्रवारी रोजी फेरीवाल्यांनी गंज गोलाईत तब्बल ९ तास ठिय्या आंदोलन केले होते. सोमवारी आयुक्तांसोबत चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. सोमवारी पुन्हा महानगरपालिकेच्या पाय-यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या एका शिष्टमंडळाने आुयक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याशी चर्चा केली.
ज्या ठिकाणी हॉकर्स झोन जाहीर केला आहे, तेथे व्यवसाय करु द्यत्तवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतू, गेल्या दोन दिवसांत मनपा प्रशासनाने कसलाही ठोस निर्णय न घेतल्याने पथ विके्रत्यांनी भाजीपाल, फळ विक्री बंद केली.