शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
सन २०२५ ते २०३० मध्ये निवडणूका होणा-या तालुक्यातील सर्व ४२ ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण निघाले नसल्याने अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे मात्र आरक्षण सोडतीमुळे सरपंचपदासाठी इच्छूक असणा-या उमेदवारांना आतापासून तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे. महसूल विभागाकडून शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी २४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता तहसील उपविभागीय अधिकारी निलंगा शरद झाडके यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार गोविंदराव पेदेवाड, नायब तहसीलदार तानाजीराव यादव यांच्या उपस्थितीत सरपंच आरक्षण पदाची सोडत करण्यात आली असून यात ४२ ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती ११, अनुसूचित जमाती १, इतर मागास प्रवर्ग १० तर सर्वसाधारणला २० जागा मिळाल्या आहेत.
गाव निहाय सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचीत जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी अंकुलगा राणी, आरी, डिगोळ, हणमंतवाडी तिपराळ यांचा समावेश आहे. अनुसूचीत जाती महिला-अंकुलगा सय्यद, हिप्पळगाव, सुमठाणा, शिवपूर, उमरदरा या गावांचा समावेश आहे. अनुसूचीत जमाती महिला- दैठणा. नागरिकांचा मागास प्रवर्ग – बोळेगाव बु.,शेंद,सांगवी घुग्गी, हालकी, थेरगाव तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी कारेवाडी, बिबराळ, लक्कड जवळगा, होनमाळ, जोगाळा व येरोळ या गावांचा समावेश आहे. सर्वसाधारण-कांबळगा, गणेशवाडी, तळेगाव दे.,धामणगाव, बेवनाळ, रापका,बाकली,हिसामाबाद, भिंगोली, चामरगा व सर्वसाधारण महिलांसाठी अजनी बु.,आनंदवाडी, कळमगाव, कानेगाव, डोंगरगाव बोरी, तळेगाव बोरी, तुरुकवाडी, नागेवाडी,वांजरखेडा, साकोळ या गावांचा समावेश आहे.