25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

लातूर : प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा इतिहास अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. ही मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी माहिती व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांनी दिली. येथील पञकार भवनमध्ये यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत आष्टीकर यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल जगभरातील लोकांमध्ये आस्था आहे. जार्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या चार्लस हॉस यांनी लिहिलेल्या तुलनात्मक राजकारण याच्या पाचव्या आवृत्तीमध्ये प्रकरण १२ मध्ये भारत हा विषय आहे. भारतातील राजकीय, आर्थिक विवेचन यामध्ये करण्यात आले आहे. कॉंग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षासोबत केवळ महाराष्ट्रातील शिवसेना या प्रादेशिक पक्षाचा समावेश या विषयात करण्यात आला आहे. भारतातील महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र समाविष्ट आहेत तर अर्थतज्ञ म्हणून माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यामध्ये स्थान दिलेले आहे. शिवसेनेच्या कार्याविषयी माहिती आहे.
बाळासाहेबांनी विदेशी कंपन्यांना केलेला विरोध, बाबरी मस्जीद उध्वस्त प्रकरण,  मुंबईतील दंगल, अशा मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिका तसेच जगातील अनेक विद्यापीठानून बाळासाहेब ठाकरे शिकविले जातात. जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी  शिवसेनासुद्धा जागतिक स्तरावर नेवून ठेवली असेच म्हणावे लागेल असेही प्रशांत आष्टीकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR