16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्याशिवसेना शिंदेंचीच; महाराष्ट्राचा फैसला!

शिवसेना शिंदेंचीच; महाराष्ट्राचा फैसला!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
शिवसेनेतील फुटीनंतर खरा पक्ष कुणाचा? हा प्रश्न कोर्टात अजून प्रलंबित आहे. पण, जनतेच्या न्यायालयात याचा फैसला झाला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर दणदणीत मात केली. ठाकरे नावाचा करिश्मा नसतानाही शिंदेंनी हे यश मिळवलं आहे.

ठाकरे नावाचा वारसा नसतानाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या परंपरागत मतदारांना आपल्याकडे खेचून आणल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे मतदारांच्या मनावर बिंबविण्यात शिंदे यशस्वी झाले.

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षांकडून सातत्याने शिंदेची गद्दार अशी हेटाळणी केली होती. हे नरेटीव्ह या निवडणुकीत चाललं नाही. पक्षफुटीनंतर ठाकरेंना सहानुभूती मिळाली आहे, असा समज होता. तो समज शिंदेंनी खोटा ठरवला. ठाकरेंची सहानुभूती संपविण्यात या निवडणुकीत शिंदे यशस्वी झाले. उद्धव ठाकरेंच्या बंडात त्यांना साथ देणा-या बहुतेक आमदारांना पुन्हा निवडून आणण्यात शिंदे यांना यश मिळालं आहे.

ठाकरेंबरोबरची लढाई आणि प्रत्यक्ष आमदार निवडून आणणं या दोन्ही पातळ्यांवर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. फिल्डवर उतरुन प्रत्यक्ष काम करणारा, नेता ही शिंदेची प्रतिमा गेल्या काही महिन्यांमध्ये निर्माण झाली होती. त्याचा शिंदेंना फायदा झाला. एकूणच राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणातील एकनाथ शिंदेंची प्रतिमा यामुळे आणखी उजळ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR