परभणी : शिवसेना महिला आघाडीने गौरी सणानिमित्त घेतलेल्या महालक्ष्मी सजावट स्पर्धेत आशा लुबाळे यांच्या महिला सक्षमीकरणावर आधारीत देखाव्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अंबिका डहाळे यांच्या वतीने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या वतीने शहरात महालक्ष्मी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक शितल रोडे यांच्या केदारनाथ देखाव्याला, तर तृतीय पारितोषिक उर्मिला शहाणे यांच्या जगन्नाथ पुरी रथयात्रा देखाव्याला देण्यात आले. पल्लवी देशमुख, प्रियंका देवतरासे, कविता काळे, पल्लवी कुलकर्णी, संगीता नाईकवाडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री जय हिंद गणेश मंडळ येथे दि. २४ सप्टेंबर रोजी आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी यशस्विनी महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. संप्रिया पाटील, प्रदीपसेठ खेडकर, मंगेश खेडकर, अनिल डहाळे, संदीप भंडारी, अरविंद देशमुख, बबलू घागरमाळे, ज्ञानेश्वर पवार, नवनीत पाचपोर, रामराव डोंगरे, बापू तावडे, संभानाथ काळे, शिवलींग बोधने, गणेश मुळे, स्वप्निल भारती, विशू डहाळे, सचिन कंठाळे, अमित पाचलींग, भूषण टेहरे, अमोल व्यास आदींची उपस्थिती होती.
स्पर्धा यशस्वीतेसाठी वंदना कदम, संगीता टेहरे, संतोषी देवके, अर्चना नेमाने, मानसी डहाळे-खेडकर, उज्वला शेंडे, संध्या शहाणे, मंदाकिनी वाघमारे, वनिता काळे, माया इंगळे, मंदाकिनी भोसले, मनीषा चव्हाण, महानंदा तावडे, स्वाती बेजगमवार, सीमा मगर, संगीता बोबडे आदींनी पुढाकार घेतला.
















