37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरशिस्त पाळा अन्यथा कारवाईसाठी सज्ज राहा - स.पो.आयुक्त यशवंत गवारी

शिस्त पाळा अन्यथा कारवाईसाठी सज्ज राहा – स.पो.आयुक्त यशवंत गवारी

सोलापूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. जो शिस्त पाळणार नाही त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा नूतन सहा. पोलिस आयुक्त यशवंत गवारी यांनी दिली.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर पुणे ग्रामीण येथील शिरूर विभागाचे पोलिस उप अधीक्षक गवारी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी गडचिरोली, पंढरपूर, वैराग, सोलापूर तालुका पोलिस ठाणे येथे सेवा बजावून शिरूर येथे कार्यरत होते. ‘पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अजित बो-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

वाहतुकीची कोंडी होणारे चौक निश्चित करून तेथे संबंधित वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल. रिक्षाचालकांची बैठक घेऊन त्यांना ड्रेस कोड व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे लक्ष देणार असल्याचे गवारी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR