18.7 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeराष्ट्रीयशेख हसीना प्रत्यार्पण प्रकरणावर भारताची ‘नो कंमेट’

शेख हसीना प्रत्यार्पण प्रकरणावर भारताची ‘नो कंमेट’

बांगलादेशच्या मागणीवर भारताची चुप्पी

नवी दिल्ली : बांगलादेशात सत्तापालट झाल्याच्या काही महिन्यानंतर अखेर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकारने भारताकडे शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. बांगलादेशने यासाठी भारताला एक पत्रही पाठवले आहे. ज्यावर आता भारताकडूनही उत्तर देण्यात आले आहे.

भारताने यावर नो कमेंट म्हटले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी याबाबत खुलास केला आणि सांगितले की, सध्या तरी नवी दिल्लीकडून याप्रकरणावर कोणतीही टिप्पणी नाही. तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी मीडिया ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, आम्ही पुष्टी करतो की, आज बांगलादेश उच्चायुक्तलयाकडून प्रत्यापर्णाच्या विनंतीसंदर्भात एक व्हर्बल नोट प्राप्त झाली आहे. सध्या तरी या प्रकरणी आमच्याकडून कोणतीही टिप्पणी नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR