शेतकरी कर्जमाफी आणि वीज बिल माफी ऐतिहासिक निर्णय : खा. चव्हाण

नांदेड : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि वीज बिल माफ माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देणारे ठरल्याचे सांगत, केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला असे उत्तर देत यावर पडदा टाकला. तर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील युती ही केवळ सहकार क्षेत्राच्या हितासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील शेतकरी कल्याण, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आणि स्थानिक राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले.

राज्य सरकारने शेतक‍-यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय योग्य वेळी हे निर्णय घेतले आहेत. शेतक-यांच्या ७.५ एचपीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीज बिल पूर्णपणे शुन्य करण्यात आले आहे. तर कृषी क्षेत्रावरील सुमारे ४८ कोटी रुपयांची जुनी थकबाकी माफ करण्यात आली आहे.

अपुरा पाऊस, अल निनोच्या संकटात अडचणीत सापडलेल्या शेतक‍-यांना दिलासा देण्यासाठी २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. हे सर्व निर्णय ऐतिहासिक असून यामुळे संकटग्रस्त शेतकरी वगार्ला मोठा आधार मिळाला आहे, असे त्यांनी नमूद केले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बोलताना खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक राजकीय स्वरूपाची नसून जिल्ह्याच्या व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आहे.

परस्पर संवाद टिकून राहावा आणि बँकेचे हित साधले जावे, यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आम्ही एकत्र आलो आहोत. या समन्वयामुळेच ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत सर्वच जण चेअरमन आणि सभासद म्हणून एकत्र आले आहेत. स्थानिक पातळीवर सहकारासाठी झालेली ही युती असून याचा प्रत्यक्ष राजकारणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. नांदेड जिल्ह्याला जर मंत्रिमंडळात स्थान किंवा मंत्रीपद मिळाले, तर निश्चितच आनंदच होईल. परंतू मंत्रीपद नसल्याने जिल्ह्यात विकासाचा कोणताही बॅकलॉग किंवा गॅप राहिलेला नाही, सर्व कामे वेगाने सुरू आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news