24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरशेतक-यांना तातडीने मदत द्या

शेतक-यांना तातडीने मदत द्या

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघातील लातूर, रेणापूर आणि औसा तालुक्यामधील अनेक भागांत गेल्या २ दिवसांत वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन दुष्काळात शेतक-यांवर पुन्हा एकदा मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतक-यांना सध्या आधाराची गरज आहे. म्हणून सरकारने तातडीने सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी केली.

लातूर, रेणापूर आणि औसा तालुक्यामधील अनेक भागांत वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे हरभरा, तुर, ज्वारी, गहू, ऊस यासह फळबागा व भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. एकीकडे कोरडा दुष्काळ आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकला आहे. अशा संकटाच्या काळात शेतक-यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना आधार देणे गरजेचे आहे, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR