39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरपिकांच्या नुकसानीची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून पाहणी

पिकांच्या नुकसानीची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून पाहणी

लातूर : प्रतिनिधी
मागच्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रब्बी पिकांचे तसेच भाजीपाला, फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी लातूर तहसीलदार तसेच कृषी विभागाच्या अधिका-यांसह लातूर तालुक्यातील गंगापूर येथे राधाकृष्ण गाडेकर यांच्या शेतावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी वादळी वा-यासह अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. लातूर तालुक्यातील गंगापूर येथील शेतकरी राधाकृष्ण ज्ञानोबा गाडेकर यांच्या शेतातील बांधावर जाऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ज्वारी पिकाची पाहणी केली.

लातूर तालुका आणि जिल्ह्यातील शेतक-यांना तातडीने मदत मिळण्याच्या दृष्टीने नुकसान झालेल्या रब्बी पिकांचे, तसेच फळबागा भाजीपाला, व इतर पिकांचे सरसकट पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करावा, अशा सूचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी संबंधित अधिका-यांना याप्रसंगी केल्या आहेत. यावेळी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तानाजी फुटाणे, डॉ. सतीश कानडे, किरण िशिंदे, मंडळ कृषी अधिकारी राजू येवले, कृषी सहाय्यक अशोक मोरे, तलाठी उत्तम बोयणे, शेतकरी अविनाश शिंदे, गुणवंत वाघे, हनमंत फुटाणे, गोविंद साळुंके आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR