सोलापूर : उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालय व साने गुरुजी कथामाला महाविदयालयीन शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविदयालयात विद्यार्थिनी सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व पद्मश्री सुमतीबाई शहा यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जोडभावी पेठ पोलिस स्टेशनच्या अंमलदार .
अनिता मोरे,श्राविका संस्थेच्या मार्गदर्शिका मा. दीप्ती शहा हे होते.मा.अनिता मोरे यांनी विद्यार्थिनींना महिला सुरक्षिततेबाबत मुलींनी कोणती काळजी घ्यावी तसेच कोणी अत्याचार करीत असतील तर त्याबाबत कोणकोणते कायदे आहेत याबद्दल माहिती सांगितली.तसेच मा.दीप्ती शहा यांनी विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली त्याचबरोबर विद्यार्थिनींनी याबाबतीत स्वतःची कोणती काळजी घ्यावी तसेच जर असे प्रसंग त्यांच्या बाबतीत घडत असतील तर पालकांना सांगावे.
याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मा. सुकुमार मोहोळे यांनी केले.प्रमुख अतिथिंचा परिचय प्रा. प्रतिभा कंगळे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे आभार प्रा.प्राजक्ता काळे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अर्चना कानडे यांनी केले. या कार्यक्रमास पोलिस हवालदार निलेश खरात,उपप्राचार्या अश्विनी पंडीत, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ तसेच प्रा. गणेश लेंगरे, प्रा.अविनाश मुळकूटकर, प्रा. सोमनाथ राऊत, प्रा. कल्याणप्पा हायगोंडे व महाविदयालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.