श्री तुळजाभवानी जमीन प्रकरणाबाबत चौकशी समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू

धाराशिव : प्रतिनिधी
लाखो हिंदू भाविकांचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या ४ हजार १२१ एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची आता राज्य शासनामार्फत चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत चौकशी समिती नेमण्याची कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यात ही समिती पूर्ण होईल, असे सांगितले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पूजार म्हणाले की, तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला जी जमीन इनाम म्हणून दिली होती. याबाबत काही प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल मंत्री महोदय यांनी याबाबत तुळजापूर इनाम जमीन बाबत चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. मूलत: इनाम जमिन ही निजाम सरकारने वेगवेगळ्या मठास काही अटी शर्ती टाकून दिली होती. यामध्ये मंदिर संस्थानचे सातबारावर नाव नाही. मंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले असल्यामुळे त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या समितीमध्ये एक वरिष्ठ अधिकारी असेल. या चौकशीमध्ये जमीन प्रधान केलेल्या अटी व शर्तीवर त्याचे पालन होते की नाही याची चौकशी होणार आहे. पुढच्या आठवड्यात समिती जाहीर होईल. या चौकशीमध्ये गुंतागुंतीचे विषय लक्षात घेता सखोल चौकशी होईल. असे जिल्हाधिकारी पुजार यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिलेल्या तक्रारीनंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’ देखील लागू होत नाही. असे असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आली आहे. तसेच श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री ३ हजार ३९७ एकर भूमी असतांना प्रत्यक्ष ताबा मात्र चार मठांमधील खाजगी व्यक्तीकडे आहे, तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली.

कायद्याचे उल्लंघन करून ६३.०३ एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली, तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत २६१ एकर जमीन तब्बल ७३ खाजगी व्यक्तींच्या नावे ७/१२ वर नोंदवली. याशिवाय अपसिंगा आणि उपळा या गावांमधील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आली आहे. असा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला आहे. त्यामुळे या महासंघाच्या तक्रारीची दखल घेऊन राज्य पातळीवरून याची चौकशी होत आहे. त्यामुळे या चौकशीत पुढे काय निष्पन्न होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news