श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

 

पंढरपूर : तालुका प्रतिनिधी
आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसराचे रूप अधिकच देखणे, दिमाखदार व भक्तिमय झाले आहे. आषाढी यात्रेनिमित्त राज्यासह देशभरातून लाखो वारकरी व भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होत आहेत. दिवस-रात्र अखंड सुरू असलेल्या दर्शन व्यवस्थेबरोबरच मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. सूर्यास्तानंतर संपूर्ण परिसर विविधरंगी प्रकाशाने उजळून निघत आहे.

आषाढी यात्रेनिमित्त राज्यासह देशभरातून लाखो वारकरी व भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होत आहेत. दिवस-रात्र अखंड सुरू असलेल्या दर्शन व्यवस्थेबरोबरच मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. सूर्यास्तानंतर संपूर्ण परिसर विविधरंगी प्रकाशाने उजळून निघत आहे. सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून, या कामामुळे मंदिराला त्याचे मूळ स्थापत्य वैभव पुन्हा प्राप्त होत आहे. प्राचीन वास्तुशैलीचे सौंदर्य अधिक ठळकपणे समोर येत असतानाच आकर्षक विद्युत रोषणाई मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवात अधिक भर घालत आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभा-यावरील कळसावर करण्यात आलेली सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. कळसदर्शनासाठी येणारे अनेक वारकरी व भाविक या अलौकिक दृश्याचे छायाचित्रण करून या अविस्मरणीय क्षणांची आठवण जतन करत आहेत. सदरची आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरे समितीमार्फत करण्यात आली असून, संपूर्ण नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी विद्युत विभाग प्रमुख राजेश तेलतुंबडे यशस्वीपणे पार पाडत आहेत.

अत्याधुनिक एलईडी माळा
विद्युत रोषणाईसाठी अत्याधुनिक एलईडी माळा, रोप लाईट, आकर्षक लटकन, सजावटीची तोरणे, व्हाईट व वॉर्म फोकस लाईट्स तसेच विविध डेकोरेटिव्ह लाईट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news