लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विशाल नगर भागातील श्री साईनाथ मंदिरात गुरुवारी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी, मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी साई मंदिरात दर्शन घेतले. मनोभावे प्रार्थना केली, त्यांच्या हस्ते साईंनाथाची आरती करण्यात आली. याप्रसंगी श्री साई मंदिर संस्थानच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख व अन्य मान्यवर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी जागृती शुगर इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मांजरा आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद पवार, सतीश पाटील विरसेन भोसले, विकास देशमुख, शाहूराज पवार, शिवाजी कांबळे आदी मान्यवर भक्त गण उपस्थित होते.