पूर्णा : विठ्ठल जयवंतराव अनमुलवाड लिखित आणि श्रेयांश प्रकाशन प्रकाशित संपूर्ण मराठी शब्द सराव लेखन पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा अभिनव विद्या विहार प्रशाला येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक हिराजी भोसले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर, जगदीश जोगदंड, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. अमोल देशपांडे, दिलीप माने, अनिल ढाले, प्रशालेचे मुख्याध्यापक सत्यनारायण रणवीर, मुख्याध्यापिका निर्मला रेड्डी, पर्यवेक्षक रमेश सूर्यवंशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
यावेळी डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. विद्यार्थ्यांना योग्य शब्द लेखन आणि शब्द लेखनाचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना व मराठी भाषा अभ्यासणा-या सर्वांसाठी संपूर्ण मराठी शब्द सराव लेखन पुस्तिका उपयुक्त ठरू शकते. ही पुस्तिका मराठी भाषेतील महत्त्वाचे शब्द, त्यांच्या योग्य लेखनपद्धती, उच्चार, अर्थ आणि वाक्य प्रयोग यांचा समावेश करून तयार केली जाते. विविध वयोगटातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार, शिक्षक आणि लेखक यांनाही पुस्तिका मार्गदर्शक ठरेल इतके महत्वाचे आहे असे सांगितले.
प्रास्ताविक लेखक अनमुलवाड यांनी केले. सूत्रसंचालन अंबादास आहेरवाडकर यांनी केले. आभार गजानन इंगोले यांनी मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.