हैदराबाद : वृत्तसंस्था
दाक्षिणात्य सुपरहिट अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने अखेर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. समांथाने एका कार्यक्रमात तिच्या गरोदरपणाची पुष्टी केली. पती राज निदिमोरू यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमादरम्यान बेबी बम्प दाखवल्यानंतर समंथा रुथ प्रभू गरोदर असल्याच्या अफवांना नुकतीच सुरुवात झाली. अलीकडील ‘मा इंटी बंगारम’ हा चित्रपट यशस्वी झाला आहे. आता तिने लगेच तिच्या गरोदरपणाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
नुकत्याच झालेल्या एका फॅन इंटरॅक्शन दरम्यान, अभिनेत्रीने मॅटर्निटी लिव्ह (प्रसूती रजा) घेण्याबद्दल बोलून या अफवेला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. ‘मा एन्टी बंगारम’च्या सक्सेस मीट दरम्यान, समांथा म्हणाली, ‘सॉरी मित्रांनो, फक्त थोडा ब्रेक आणि मग मी परत येईन. खरं तर, मला आता प्रसूती रजा घ्यावी लागेल, पण मी खूप खूप आनंदी आहे.’
ब्रेकनंतर तिच्या चाहत्यांसाठी एका रोमांचक प्रोजेक्टवर काम करण्याबद्दल यावेळी तिने सांगितले. या कार्यक्रमात समांथाबरोबर तिचा पती देखील उपस्थित होता. आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देताना समांथा खूप खुश दिसली. या जोडप्याने १ डिसेंबर २०२५ रोजी लग्न केले. राज आणि समांथा यांची जोडी अनेकांना आवडते. ‘द फॅमिली मॅन २’च्या शूटिंगदरम्यान हे दोघेही एकमेकांना भेटले होते.
















