समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ ठार तर १ गंभीर

वर्धा : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर विरूल इंटरचेंजजवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.

प्राथमिक माहितीनुसार, आयशर ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आयशर ट्रकचा चालकही गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ट्रकमधील क्लिनर अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले.

तर या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मृतदेह पुलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या भीषण अपघाताचा पुढील तपास पुलगाव पोलिस करत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, मागील २९ जून रोजीही असाच एक अपघात अमरावती येथे घडला होता. चंद्रपूरकडून अकोल्याकडे जात असताना उभ्या कंटेनरला कार मागून धडकल्याने त्यामधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. देशातील सर्वांत आधुनिक आणि वेगवान महामार्गांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गावर वेगाइतकाच वाहनधारकांचा निष्काळजीपणाही वाढत असल्याचे वास्तव आहे. त्यात महामार्गाच्या कडेला बिनधास्त उभे केलेले ट्रक, कंटेनर आणि कार हेच आता भरधाव वाहनांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ बनत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news