सेलू : खेड्यापाड्यातील मुलांना शहरांमध्ये राहून शिक्षण घेता आले पाहिजे यासाठी त्यांनी वसतीगृहे उभारली. त्याकरिता समाजातील प्रतिष्ठित व श्रीमंत लोकांचा सहभाग घेऊन ती चालवण्यात येत असत. अशा प्रकारे शाहू महाराजांची शैक्षणिक दुरदृष्टी ही समाजहितासाठी उपयुक्त होती. तेंव्हा आपण सर्वांना शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन सदाशिव भालेराव यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भालेराव बोलत होते. शैक्षणिक जीवनस्तर उंचावून समाजातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाव्यात. बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित करुन तरुणांचा हाताला काम दिले पाहिजे. त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा देशाचा अर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत झाली पाहिजे.
तरच आपण शैक्षणिक क्रांती घडवून आणली असे म्हणता येईल असे अध्यक्षीय समारोप प्रसंगी गंगाधर गुंजकर यांनी सांगितले.
प्रास्ताविक सुत्रसंचलन ग्रंथपाल महादेव आगजाळ तर आभार अनिरुद्ध टाके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी दिपक गजभारे, चंद्रकांत कल्याणे, विठ्ठल दळवे, लक्ष्मणराव घोडके, मगर बिल.आर., एस.आर. पवार, शिवाजी बोचरे, महेंद्र काळे, व्हि.यु. प्रधान इत्यादी उपस्थित होते.