22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनसलमाननंतर शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी

सलमाननंतर शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : वृत्तसंस्था
सलमान खाननंतर आता बॉलिवूड किंग शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरूखच्या कार्यालयात धमकीचा फोन करण्यात आला होता. हा फोन रायपूरमधून करण्यात आला होता. आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे पथक रायपूरला रवाना झाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, फैजान खान नामक व्यक्तीने शाहरूखची प्रोडक्शन कंपनी रेड चिलिजच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली. पोलिसांनी कॉल ट्रेस केला असता रायपूरमधून सदर फोन आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तात्काळ रायपूरला दाखल झाले. रायपूरमध्ये आरोपीचा शोध सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR