लातूर : प्रतिनिधी
लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने अहमदपूर हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारे सहा हायवा, बेकायदेशीररित्या प्राण्यांची वाहतूक करणारे एक वाहन असा ९७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळुने भरलेल्या सहा हायवा एकूण किंमत ७३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी लिंबाजी कदम रा. भेडेगाव, ता. लोहा, ओमा वानखेडे रा. बेटसांगवी, चंपती पवार रा. भाद्रा, आरीफ शेख रा. सांगवी, शिवदास कदम रा. लोहा, मारूती कदम रा. लोहा, नागनाथ मिटकर रा. सेलगाव, मिनहाज शेख रा. काजळहिप्परगा, सखाराम राजगीर रा. अहमदपूर, राजाभाऊ वानखेडे रा. कपलेश्वर, वैजना लुप्ते रा. शिवली बाजीराव, शाहरूख सय्यद रा. बामाचीवाडी, ता. उदगीर व अजय गुरूडे रा. हेर यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने आयशर टेम्पोतून १७ बैल अवैधरित्या वाहून नेत असताना वाहनासह जप्त केले. त्याची किंमत २३ लाख ५० हजार रूपये दर्शविण्यात आली आहे. या प्रकरणी मोहसीन शेख रा. सावदा, ता. रावेर, सईद शेख रा. बगारी ता. जामनेर, अखिल शेख रा. जामनेर, सुपडू शेठ रा. जळगाव, मोहम्मद रफी रा. जहिराबाद यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन गुन्ह्यामध्ये बैल, वाळू, वाहनं असा एकूण ९७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.