23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरसामान्य कुटुंबातील लेकराला निलंग्याचा आमदार करणार

सामान्य कुटुंबातील लेकराला निलंग्याचा आमदार करणार

निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा विधानसभा निवडणुकीच्या ंिरगणात प्रचारात चांगलीच रंगत भरली असून आरोप प्रत्यारोपातून परस्परावर तोफ डागली जात आहे . काँग्रेस व भाजपाच्या तगड्या दुरंगी फाईटमध्ये परस्परावरील आरोपाचा कलगी तुरा रंगला आहे. वीस वर्षात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असल्याची खंत व्यक्त करीत आता आमचं ठरलंय काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके या सामान्य कुटुंबातील लेकराला आमदार करायचं अशा बोलक्या प्रतिक्रिया मतदारातून व्यक्त होत आहेत.
निलंगा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये चांगलीच रंगत भरली आहे . या रणधुमाळीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके व भाजपा महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. साळुंके व निलंगेकर यांनी मतदारसंघातील गावोगावी सभा, कॉर्नर बैठका , जनसंवाद यात्रा, जनसंपर्क दौरे व मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांच्या जनसंपर्कातून काँग्रेस व भाजपा यात आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला आहे.
मतदारांनी तीन वेळेस संभाजी पाटील यांना आमदारकी व एक वेळेस आई रुपाताई पाटील निलंगेकर यांना खासदारकी असा कौल दिला तरीही वीस वर्षाच्या कालखंडामध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतरसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने मतदारसंघात विकासाची वनवा दिसते.  निलंगा शहरासह तालुक्यातील रस्त्याची व गटाराची दुरवस्था, कच-याचा प्रश्न, ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे कामे होत असतानाही आमदार निलंगेकर यांचे दुर्लक्ष झाले व मतदारसंघाच्या संपर्कापासून कोसो दूर राहणे यामुळे मतदारसंघातील मतदार आमदार निलंगेकर यांना कंटाळून आता आमचं ठरलं शेतकरी पुत्र गरीबाच लेकरू काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांना निलंगा मतदारसंघाचा आमदार करायचं अशा बोलक्या प्रतिक्रिया मतदारसंघातील गावागावातील मतदारातून व्यक्त होत असताना दिसत आहेत.  भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनीही गावागावात नागरिकांशी संवाद साधत  केंद्र व राज्य सरकारने  राबविलेल्या योजनेची माहिती देत मतदारसंघाच्या विकासासाठी आणलेल्या निधीचा जागर घालत आहेत.
आमदार निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघाच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी आणला मात्र बहुतांश कामाची सगेसोय-याच्याच खांद्यावर गुत्तेदारीची धुरा असल्याने आम्ही केवळ सतरंज्या उचलायला का ? अशा संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या कार्यकर्त्यातून उमटत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्येही कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेने वेग घेतली असल्याचे चित्र मतदारसंघात पहावयास मिळत आहे. एकंदरीत निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारामध्ये दुरंगी तगडी फाईट होत असल्याचे चित्र दिसून येत
आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR