सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

पालघर : प्रतिनिधी
पालघरमध्ये व्यावसायिकाने आत्महत्या केली. डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे ही घटना घडली. डहाणू तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खासगी सावकारीने या व्यावसायिकाचा बळी घेतला. अमानुष व्याजदर, सततचा मानसिक छळ, शिवीगाळ आणि धमक्यांना कंटाळून एका डायमेकिंग व्यावसायिकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहिली. यामध्ये त्यांनी ५ खासगी सावकारांची नावं लिहिली. या प्रकरणी वानगाव पोलिस ठाण्यात सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे राहणा-या किशोर दवणे या व्यावसायिकाने आत्महत्या केली. किशोर डायमेकिंगचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. व्यवसायवाढीसाठी त्यांनी नवीन वायरकट मशिन खरेदी केली होती. तसेच वर्कशॉपचे नूतनीकरणही केले होते. यासाठी वेगवेगळ्या सावकारांकडून कर्ज घेतले होते. पण अलीकडील काळात व्यवसायात आलेल्या मंदीमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सावकाराकडून त्यांचा जाच सुरू होता.

किशोर दवणे यांनी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सुरुवातीला मदतीचा हात वाटणारी ही रक्कम पुढे जाचक ठरली. घेतलेल्या पैशांपेक्षा अधिक रक्कम परत देऊनही व्याज थकल्याचे सांगत संबंधित सावकारांकडून सातत्याने फोनवरून त्रास दिला जात होता. मानसिक छळ, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात होत्या. रस्त्यात अडवून चारचौघांत अपमानित केले जात होते. त्यामुळे किशोर दवणेंचा मानसिक ताण वाढला होता. याच त्रासाला कंटाळून त्यांनी २ ऑगस्टला राहत्या घरी आत्महत्या केली. बेडरूममध्ये त्यांनी गळफास घेत आयुष्य संपवले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news