लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून लातूरच्या फ्रुट मार्केटमध्ये फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दिपावलीनंतर थंडीची चाहूल लागण्यास सूरूवात झाल्याने पोष्टीक फळांची मागणीत वाढ झाली आहे. त्याप्रमाणे शहरात सध्या फळांच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील घाउक बाजारात विविध प्रकारची फळे उपलब्ध आहेत. संत्री, मोसंबी, सीताफळ, सफरचंद, पेरू, केळी, चिकू, पपई, आवळा आदी विविध फळे फु्रट मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध झाले असून ग्राहक त्यांचा आस्वाद घेत आहेत.
गेल्या महिनाभरापासून शहरातील बाजारपेठेत फळांची मोठी आवक होत असल्याने दर देखील सामान्याच्या आवाक्यात आहेत. सीताफळाचा दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलो आहे. संत्री ७० रुपये किलो दराने मिळत आहे. पेरू ४० ते ५० रुपये किलो दराने मिळत आहेत. लातूरसह शेजारील जिल्ह्यातून शहराच्या मार्केट यार्डातील बाजारपेठेत फळांची आवक वाढली आहे. दोन तीन महिन्यात ऊन्हाचा पारा चढल्यानंतर बाजारपेठेत रसाळ फळांची आणखी आवक वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी वर्तविली आहे.
सध्या बाजारपेठेत संत्री, मोसंबी, सीताफळ, सफरचंद, केळी, चिकू ही फळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा मोठा कल आहे. शहरातील मार्केटमध्ये आरोग्यदायी आवळयाची आवक होत असून, ७० ते ९० रुपये किलो दराने ते मार्केटमध्ये विकले जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फळांचे भाव वाढले असलेतरी ग्राहक खरेदी करीत आहत्ो. सध्या शहरातील मार्केटमध्ये सफरचंद ६० ते ७० रुपये किलो दराने मिळत असून, संत्री, मोसंबी, सीताफळ, पेरू, केळी, चिकू, हेही फळे त्याच्या तुलनेत मिळत आहेत.