25.6 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeमुख्य बातम्यासिद्धरामय्या-शिवकुमार यांच्या विशेष अधिका-यांत हाणामारी

सिद्धरामय्या-शिवकुमार यांच्या विशेष अधिका-यांत हाणामारी

नवी दिल्ली : प्रतिनिधी
कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या विशेष अधिका-यांचा एकमेकांबरोबर वाद झाला. हा वाद इतका वाढला की, कर्नाटक भवनमध्ये दोन्ही अधिका-यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, त्यानंतर औपचारिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी सी. मोहन कुमार आणि उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी एच. अंजनेय यांच्यात ही हाणामारी झाली. मोहन कुमार यांनी सर्वांसमोर अंजनेय यांना मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना इतर सरकारी कर्मचा-यांच्या उपस्थितीत घडली.

हा वाद शाब्दिक वादाने सुरू झाला, पण कर्नाटक भवनातील काही महिला कर्मचा-यांनी उपमुख्यमंत्र्यांचे अधिकारी एच. अंजनेय यांच्यावर अपशब्द आणि असभ्य शब्द वापरल्याचा आरोप केला. महिला कर्मचा-यांच्या तक्रारीनंतर मोहन कुमार यांनी अंजनेयांशी या प्रकरणाबद्दल बोलले, यामुळे प्रकरण आणखी तापले. दोन्ही अधिका-यांमध्ये जोरदार वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप झाले.

संध्याकाळी महिला कर्मचा-यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अधिका-याच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त निवासी आयुक्तांना महिला कर्मचा-यांच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आणि आवश्यक असल्यास औपचारिक चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले. या संपूर्ण घटनेने कर्नाटकच्या राजकारणातील अंतर्गत कलह आणि गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR