नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मधील पहिलाच सामना भारताने जिंकल्यामुळे या टी-२० विश्वचषकाच्या ट्रॉफीवर भारत पुन्हा एकदा आपले नाव कोरणार असे स्वप्न भारतीय क्रीडाप्रेमी पाहू लागले आहेत. दरम्यान, भारतीय संघाने अफगाणिस्तानवर ४७ धावांनी दमदार विजय मिळवला. अफगाणिस्तानसमोर भारताने १८२ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २० ओव्हरमध्ये केवळ १३४ धावांवर ऑलआऊट झाला. या विजयात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा मोठा वाटा आहे. त्याने ४ ओव्हर्समध्ये ७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. अशी कामगिरी करत त्याने १७ वर्षांपूर्वीचे आर. पी. सिंगचे रेकॉर्ड मोडले आहे.
बुमराहने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मध्यम जलदगती गोलंदाज आर. पी. सिंगचे १७ वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोडत एक नवे रेकॉर्ड केले आहे. २००७ मध्ये आर. पी. सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत १३ धावा देऊन ४ विकेट घेतल्या होत्या.
त्या सामन्यात आर. पी. सिंगने १९ चेंडूंवर एकही धाव दिली नव्हती. त्याने तीन चेंडू वाईड टाकले आणि त्याच्याविरुद्ध फक्त एक चौकार मारला होता. त्यानंतर १७ वर्षांनी आता बुमराहने २४ पैकी २० चेंडंूमध्ये एकही धाव दिली नाही. टी-२० विश्वचषकातील हा नवा भारतीय विक्रम आहे.