27.8 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeनांदेडसूर्यकांतराव देशमुख यांना विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार

सूर्यकांतराव देशमुख यांना विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार

गुरुवारी पुरस्कार वितरण सोहळा, सहकारमंत्र्यांची उपस्थिती
नांदेड : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ््यानिमित्त २०२३-२४ वर्षासाठीचे पुरस्कार घोषित करण्यात आले. यात २०२३-२४ या वर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार झरी (जि. परभणी) येथील सूर्यकांतराव देशमुख (कांतरावकाका झरीकर) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर रासकर हे असणार आहेत.

कांतरावकाका झरीकर यांना महाराष्ट्र शासनाने कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी कृषी, जलसंधारण, कृषीपूरक उद्योग क्षेत्रात विविध प्रयोग करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच जांभुळबेट संवर्धन, एक गाव, एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमी चळवळही राबविली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने २०२३-२४ चा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.

यासोबतच उत्कृष्ट महाविद्यालय शहरी विभागात लातूर येथील दयानंद फार्मसी महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षक शहरी विभागात परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रोहिदास नितोंडे, तरुण शिक्षक संशोधक महाविद्यालयीन शिक्षकामधून लातूर येथील दयानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. क्रांती सातपुते आणि विद्यापीठ परिसर संकुलातून संगणकशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. अर्चना साबळे यांना जाहीर झाला आहे. या सर्वांना उद्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR