20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeउद्योग‘सेबी’ची कारवाई : अनिल अंबानी यांच्यावर ५ वर्षांची बंदी, २५ कोटींचा दंड 

‘सेबी’ची कारवाई : अनिल अंबानी यांच्यावर ५ वर्षांची बंदी, २५ कोटींचा दंड 

मुंबई : वृत्तसंस्था
शेअर बाजार नियामक सेबीने उद्योजक मुकेश अंबानी यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय त्यांच्यावर ५ वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घालण्यात आली. अनिल अंबानी यांच्याव्यतिरिक्त रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख अधिका-यांसह अन्य २४ कंपन्यांवर सेबीने कंपनीकडून पैसे वळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
सेबीच्या या कारवाईनंतर अनिल अंबानी कोणत्याही लिस्टेड कंपनी किंवा मार्केट रेग्युलेटरकडे रजिस्टर्ड कोणत्याही मध्यस्थात संचालक किंवा मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी (केएमपी) म्हणून ५ वर्षे सिक्युरिटीज मार्केटमध्ये सामील होऊ शकणार नाहीत. याशिवाय रिलायन्स होम फायनान्सवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली असून त्यावर सहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अनिल अंबानी यांनी आरएचएफएलच्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचा-यांच्या मदतीने आरएचएफएलमधून निधी काढण्यासाठी एक फसवी योजना राबविली होती, जी त्यांनी त्यांच्याशी संबंधित संस्थांसाठी कर्ज म्हणून ठेवली होती, असे सेबीच्या २२ पानांच्या अंतिम आदेशात म्हटले.
आरएचएफएलच्या संचालक मंडळाने अशा प्रकारच्या कर्ज पद्धती रोखण्यासाठी कडक सूचना दिल्या होत्या आणि कॉर्पोरेट कर्जाची नियमित छाननी केली होती, परंतु कंपनी व्यवस्थापनाने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचेही म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR